बीडबीड जिल्हा

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांना निवेदन

आ. सुरेश आण्णा धस यांच्या वतीने आष्टी,पाटोदा, शिरूर का., तालुक्यातील शिष्टमंडळाचे रोहयोच्या विविध कामाचे निवेदन दिले.

बीड,महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री मा.ना. संदीपानजी भुमरे साहेब बीड जिल्ह्यातील रोहयो कामकाज संदर्भात आढावा घेण्यासाठी आले असता रोहयो विभाग योजनेच्या त्रुटी सुधारणेबाबत, तसेच ‘ क ‘ वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायत अंतर्गत मनरेगाची कामे नाविन्यपूर्ण करण्यासाठी परवानगी व शहरी-ग्रामीण भागात रोपवाटिका प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी, कारण मनरेगा अंतर्गत रोपवन संगोपन योजनेसाठी रोपांची उपलब्धता स्थानिक ठिकाणी होत नाही, त्यामुळे पर- राज्यातून रोपांची आयात करावी लागते, यासह शेततळे, जलसिंचन विहीर, बांधबंदिस्तीची कामे इत्यादी विषयावर आ सुरेश अण्णा धस यांच्या वतीने आष्टी,पाटोदा, शिरूर का. तालुक्यातील शिष्टमंडळाच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्य ॲड प्रकाश दादा कवठेकर, भाजपा जेष्ठ नेते दशरथ दादा वनवे, माजी जि.प.सदस्य हरिबप्पा घुमरे आदींची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button