परळीबीड जिल्हा

वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. डी.व्ही मेश्राम सर यांची नियुक्ती

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली

 

परळी वैजनाथ ) :- शहरातील जवाहरलाल शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालययाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ.डी.व्ही.मेश्राम सर यांची नियुक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या पत्रान्वये झाली आहे. आज त्यांनी पदभार स्विकारला आहे. वैद्यनाथ महाविद्यालयावर आता पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शन राहणार आहे. दरम्यान पदभार स्विकारल्यानंतर नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या हस्ते प्रा.डी.व्ही.मेश्राम सरांचा सत्कार करण्यात आला.

जवाहर एज्युकेशन संचलित वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या रिक्त असलेल्या जागेवर प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या आदेशानुसार मान्यता मिळाली आहे. सेवा ज्येष्ठाता यानुसार कार्यालयीन अधिक्षक ए.एन.रोडे यांच्या माध्यमातून पदभार स्वीकारला आहे. मंगळवार दि.31 आँगस्ट रोजी पदभार स्विकारला आहे. यावेळी सर्व कर्मचारी आणि शुभचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी जवाहरलाल एज्युकेशन सोसायटीचे सदाशिव आप्पा मुंडे, भास्कर (मामा) चाटे तसेच प्रा.प्रदिप खाडे सर, सुरेश (नाना) फड, प्रा.डॉ. पी.एल.कराड, प्रा.शंकर कापसे व इतर उपस्थित होते. नवनियुक्त प्रभारी प्राचार्य विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकास शीस्त आणि संस्कार तसेच कर्मचाऱ्यांचे हित रक्षण उत्तम प्रशासन यावर भर देवून महाविद्यालयची प्रगती करण्यावर माझा भर राहणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. प्रचार्यपदी प्रा.डॉ. मेश्राम सर यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button