गेवराईबीड जिल्हा

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही—-विजयसिंह पंडित

नांदगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ

गेवराई ) राज्यात सत्ता आपली आहे, त्यामुळे आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करायची आहेत. ग्रामीण भागातील विविध विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. आपले सहकार्य हवे आहे. आपल्या भागात होणारी कामे दर्जेदार करुन घेण्यासाठी लक्ष घाला असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. मौजे नांदगाव-मालेगाव-मजरा व रामेश्वर या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकसकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

मौजे नांदगाव-मालेगाव-मजरा व रामेश्वर या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक ३० रोजी करण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य लक्ष्मणराव देवकर, माजी उपसभापती शेख मिनाजभाई, माजी सभापती वसंतराव उबाळे, बाजार समितीचे उपसभापती शामराव मुळे, माऊली आबुज, सरपंच सुनिल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मालेगाव मजरा येथे स्मशानभूमी बांधकाम, नांदलगाव येथे नवीन पाणी पुरवठा विहीर बांधकाम, रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत १० घरकुल मंजूरी पत्रांचे वाटप, नांदगाव येथे पाणीपुरवठा च्या पूर्ण झालेले विहिरीचे जलपूजन आदी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला परमेश्वर धायगुडे, सुभाष जगदाळे, जुगलशेठ रांदड, नारायण डरफे, राम शिंदे, दत्ता घवाडे, शंकर घवाडे, सुनील राऊत, उमेश येवले, प्रदीप चव्हाण, रवी शिर्के, रामेश्वर वाघमोडे, विष्णु गाडे, बाबा रडे, तैमूर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button