गेवराईबीड जिल्हा

तळेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वृक्षारोपण

५१ झाडांचे वृक्षारोपण; ह.भ.प.बाळनाथ महाराज येवलेंचा पुढाकार

गेवराई:तालुक्यातील तळेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सव निमित्त पंचलिंगेश्वर देवस्थान तळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मठाचे मठाधिपती ह.भ.प.बाळनाथ महाराज येवले, ह.भ.प.प्रल्हाद महाराज येवले, प्रा.रोहीदास येवले यांच्या सह गावातील भजनीमंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सवाचे औचित्य साधून पंचलिंगेश्वर देवस्थान तळेवाडी येथे मठाधिपती ह.भ.प.बाळनाथ महाराज येवले यांच्या पुढाकारातून विविध प्रकारच्या ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. मठाच्या बाजुने झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी ह.भ.प.बाळनाथ महाराज येवले व ह.भ.प.प्रल्हाद महाराज येवले, बालासाहेब चौधरी, बुधाजी येवले,सेनापती पवार,रोहिदास येवले, साळोजी गोंजारे, शिवाजी थोटे, मच्छिंद्र गोंजारे, बाबूतात्या तरांगे,पांडुरंग चौधरी,गुणाजी येवले,किसन गोंजारे,राम येवले,विष्णु येवले, सखाराम गोंजारे शहादेव येवले, श्रीमती.कमलाबाई धुमक, कुशावर्ता पवार,धुरपदा गोंजारे, अलका येवले, सुरेखा येवले, शितल येवले, इंदूबाई थोटे, लताबाई तरांगे, विमालताई गोंजारे, सुकमला धोत्रे,चंद्रकला टापरे, सौ.निर्मला गोंजारे, मंगल गोंजारे सह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button