बीडबीड जिल्हा

पाऊस व वारे या मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा -राजेंद्र आमटे

शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे निवेदन 

बीड ) शेतकरी हा वारंवार निसर्गाच्या आवकृपेमुळे शेतकरी अडचणीत येत आहे अचानक झालेल्या अतिवृष्टी व वारे या मुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्याचा कापूस, उडीद ,सोयाबीन हे पाण्याखाली गेला आहे.अनेक ठिकाणी कापूस,ऊस जास्तीच्या वाऱ्यामुळे जमिनीशी लोळतात अनेक पिकाच्या शेतात तळ्यासारखी परस्थिती निर्माण झाली आहे या मुळे शेतकऱ्यांनाचे अतोनात नुकसान झाले आहे महसूल प्रशासनाने तहसीलदार, तलाठी,मंडळअधिकारी यांनी व कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी इतर अधिकारी यांनी तात्काळ शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत या मागणीसाठी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार सय्यद यांना पाऊस व वारे या मुळे शेतकऱ्यांनाच्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे व नुकसान भरपाई ची मागणी करून करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले या वेळी शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस सुहासजी पाटील साहेब,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,सुशांत सातळकर ,कायदे सल्लागार शरद तिपाले,मोहन गव्हाणे,युवराज शेळके,संतोष आमटे, आदींच्या निवेदन देण्यात आले

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button