गेवराईबीड जिल्हा

पिक विमा धारकांचे ऑफलाईन अर्ज स्विकारा – अमरसिंह पंडित

तहसिलदारांची भेट घेवून नुकसानग्रस्तांच्या मदती बाबत केली चर्चा

गेवराई, ) ः- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत तात्काळ पंचनामे करावेत, पिक विमाधारक शेतकर्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्विकारा, पशुधनाच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश करा यांसह विविध मागण्या करून माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळणे संदर्भात तहसिलदारांची भेट घेवून प्रशासनाबरोबर सविस्तर चर्चा केली. यावेळी महसुल आणि कृषी विभागाचे अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील तलवाडा, जातेगाव, धोंडराई या महसुल मंडळासह इतर भागातही अतिवृष्टीमुळे शेतजमीनीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी काल तलवाडा भागात भेट देवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना धिर दिला. नुकसानीची पाहणी करून त्यांनी शिष्ट मंडळासह आज सायंकाळी तहसिल कार्यालयात तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतीच्या नुकसानी बाबत सविस्तर चर्चा करून तात्काळ नुकसानीचे अहवाल शासनाकडे पाठविण्याची सूचना केली. यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, विमा कंपनीची वेबसाईट बंद असून ऑनलाईन नुकसानीचे अर्ज दाखल करण्याची लिंक सुध्दा बंद आहे. पावसामुळे ग्रामीण भागात नेटवर्कचा मोठा प्रश्‍न आहे, त्यामुळे विमा कंपनीने ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारले पाहिजेत, पशुधनाच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे करण्याची त्यांनी मागणी केली. फळबागा, ऊस शेतीसह कापूस, सोयाबीन या पिकांचे कमी अधिक प्रमाणात सर्वत्र नुकसान झाले असल्यामुळे महसुल विभागाने बारकाईने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मागणीनंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी चार काऊंटरच्याद्वारे तालुका कृषी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने पिक विमाधारक शेतकर्यांचे अर्ज स्विकारणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. पुरामध्ये वाहून गेलेल्या पशुंच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आणि पंचनाम्याच्या आधारे त्यांना मदत मिळणार असल्याचे महसुल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आणि घरांच्या पडझडीबाबतचे पंचनामे सुरु असल्याचे तहसिलदारांनी सांगून या बाबतची तपशिलाने माहिती दिली. यावेळी तहसिलदार सचिन खाडे, तालुका कृषी अधिकारी सोनवणे यांच्यासह संबंधित महसुल मंडळाचे मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, माजी सभापती कुमार ढाकणे, निराधार समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button