ब्रेकिंग न्यूज

मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांचा गौरव होणार – अमरसिंह पंडित

शारदा प्रतिष्ठानचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

गेवराई, ) ः- शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याबरोबरच कोविड संक्रमणाच्या कठिण काळात शिक्षकांनी अतिशय महत्वाची भुमिका निभावली आहे. अशी अतुलनीय कामगिरी करणार्या शिक्षकांचा शारदा प्रतिष्ठानकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला जातो, यावर्षी रविवार, दि.५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्याने सकाळी ११ वाजता र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या सभागृहात प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार तथा दै.दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे हे उपस्थित राहणार आहेत.

गेवराई विधानसभा मतदार संघातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या शिक्षकांना शारदा प्रतिष्ठानकडून मागील १२ वर्षांपासून सातत्याने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविले जाते. मागील वर्षी कोरोना परिस्थितीमुळे पुरस्कार वितरण समारंभ होवू शकला नाही. दोन वर्षांपासून शालेय अध्यापन प्रत्यक्षात बंद असले तरी शिक्षकांनी कोविड संक्रमणाच्या कठिण काळात सामाजिक भान जोपासत भरीव काम केले आहे, शारदा प्रतिष्ठानचा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार कोविड संक्रमणाच्या कठिण काळात केलेल्या कामगिरीसाठी समर्पित आहे. यावर्षी रविवार, दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोदावरी सभागृह, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ आयोजित केला असून दै. दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी दिली.

यावर्षी निवड समितीने प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी रमेश ढाकणे (जि.प.प्रा.शा, गेवराई), सतिष सदाफळे (जि.प.प्रा.शा, गणेशनगर), अमोल मनकटवाड (जि.प.प्रा.शा, कटचिंचोली), प्रकाश साबळे (जि.प.कन्या प्रशाला, गेवराई), विजय जाहेर (न्यु हायस्कुल, गेवराई) आणि जगन्नाथ जाधव (जि.प.प्रा.शा, गौंडगाव) यांची निवड केली आहे. निवड समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ञ नारायणराव मोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये आदर्श शिक्षक म्हणून यांची निवड करण्यात आली. शारदा प्रतिष्ठानकडून अधिकृतरित्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करून ही नावे जाहिर केली आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button