ब्रेकिंग न्यूज

एक महिना उलटूनही मेडिकल चोरीचा तपास लागेना !

मागच्या महिन्यात व्यापाऱ्यांनी दिलेले निवेदन

आष्टी (प्रतिनिधी) :- आष्टी ता.परतूर येथे गेल्या महिन्यात 1 रोजी च्या रात्री आष्टी मोंढा भागातील पाच औषधी दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला होता यात लाखाचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली होती या घटनेस आज एक महिना उलटला तरी या चोरी प्रकरणात काही तपास लागला नसल्याने तपास कामाची गती कशा पद्धतीची आहे या वरूनच दिसून येत आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की गेल्या महिन्याच्या दिनांक 1 रोजी रात्री बारा ते दीड वाजेच्या सुमारास मोंढा भागतील मुख्य रस्त्यावरील या भागातील पाच वेगवेगळ्या ठिकाणच्या औषधी दुकानी चोरट्यांनी फोडल्या होत्या यात पांडुरंग कल्याण घुले यांच्या विधी मेडिकल मधुन 70 हजार ,लक्ष्मी नारायण सरकटे यांची कुलस्वामिनी मेडिकल मधुन अंदाजे 10 ते 15 हजार ,गणेश लक्षमण काटे यांच्या गणेश मेडिकल मधुन 7 हजार ,बद्रीनारायण आबासाहेब काटे यांच्या गायत्री मेडिकल मधुन 5 हजार व ज्ञानेश्वर विठ्ठल शेळके यांच्या श्री स्वामी समर्थ मेडिकल मधुन 5 हजाराची अशी एकुण 1 लाख 2 हजार रुपये रोख रकमेची चोरी झाली होती,अनेक ठिकाणी चोरटे सी.सी.टीव्ही मध्ये कैद देखील झालेले होते या घटनेत कुलस्वामिनी मेडिकल च्या बाहेर लावण्यात आलेला सी सी टीव्ही कॅमेरा चोरट्याने तोडला होता जवळपास तीन चोरटे असल्याची माहिती मिळून आली होती सर्व ठिकाणी शटरचे कोंडे तोडून चोरी करण्यात आली असता चोरट्यांनी केवळ रोख रकमेवरच डल्ला मारला इतर कुठल्याही औषधीला चोरट्यांनी हात न लावता सदरील चोरी केली होती रात्री अंदाजे बारा ते दीड वाजेच्या आसपास या सर्व घटना घडल्या होत्या इतक्या लवकर आणि मुख्य रस्त्यावरील औषधी दुकानी चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात होती दरम्यान या चोऱ्यांच्या तपासासाठी सपोनि शिवाजी नागवे यांनी पथक रवाना केले असल्याची माहिती त्यांनी दिली होती व येत्या काही दिवसात आरोपी निष्पन होतील असे सांगितले होते मात्र आज एक महिना उलटला तरीही तपास सुरूच आहे अशी स्थिती असून चोऱ्यांचा तपास लागणार तरी कधी असा प्रश्न व्यापारी व नागरिकांना पडला आहे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button