ब्रेकिंग न्यूज

बजरंग दल तालुकाध्यक्षपदी मनोज कोरडे

दिंद्रुड ) :- बजरंग दल माजलगावच्या तालुका
(प्रखंड) अध्यक्षपदी (संयोजक) प्रखर राष्ट्रभक्त, गोरक्षक व तरुण कार्यकर्ते मनोज प्रशांतराव कोरडे यांची निवड करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोरडे यांची मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नुकताच माजलगाव येथे विश्व हिंदू परिषद या प्रखर हिंदुत्ववादी संघटनेचा 57 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे उपस्थित होते तर विभागीय संघटन मंत्री संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मनोज कोरडे यांची प्रखंड संयोजक म्हणून निवड करण्यात आली.
मनोज कोरडे हे कडवट राष्ट्रभक्त असून गोपालन व संवर्धन यात त्यांना विशेष आवड आहे. हिंदुत्ववादी विचारांशी बांधिलकी असलेल्या मनोज कोरडे यांना माजलगाव प्रखंड संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सनातन धर्माचे व भारतभुमीचे कार्य अखंडितपणे करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे कोरडे म्हणाले.
यावेळी विहिंपचे जिल्हा मंत्री ऍड बाळासाहेब तेरकर, प्रखंड अध्यक्ष अभय कोकड, प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत जोशी, प्रा.रमेश गटकळ आदी मान्यवर मंडळींसह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button