ब्रेकिंग न्यूज

बँक ऑफ महाराष्ट्रचे किसान संपर्क अभियान

कर्ज एक रकमी भरून नवीन कर्ज मिळवण्याची शेतकऱ्यांना संधी

परतूर तालुक्यातील आष्टी येथील

बँक ऑफ महाराष्ट्र आष्टी शाखेच्या वतीने दि.3 रोजी अकोली येथे नवीन पिक कर्ज व थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी किसान संपर्क अभियानातंर्गत शिबीर घेण्यात आले.यामध्ये कृषी थकीत कर्जाची एक रकमी परतफेड करून जुन्या कर्जदारांना पुन्हा नव्याने कर्ज देण्याची योजना बँकेने सुरू केली असून,या एक रकमी परतफेड योजने अंतर्गत थकीत शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ आणि मूळ रकमे मध्ये ही सूट देण्यात येणार आहे.तसेच या आधी घेतलेल्या कर्जाचे नियमित पणे परतफेड करून खाते चालू ठेवल्यास शून्य टक्के व्याज दराने कर्ज मिळते तेव्हा या संधीचा फायदा जास्तीत जास्त शेतकरी यांनी घ्यावा असे आव्हान शाखाधिकारी निलेश खरात यांनी थकीत कर्जादार शेतकऱ्यांना केले आहे. या प्रसंगी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना या वार्षिक ३४२ रु प्रीमियम असणाऱ्या विमा योजना बद्दल ही त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.या दोन्ही योजनांमार्फत अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रुपयांचा विमा मिळतो.त्यामुळे प्रत्येक खातेदार यांनी हा विमा काढावा व १० वर्षाच्या आतील मुलींसाठी असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेचा ही लाभ घेण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित शेतकरी यांना केले. यावेळी गावातील तुका आबा सोळंके, मा.सभापती सिद्धेश्वर सोळंके,दिलीप देशमुख, गोविंद सोळंके,यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button