ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर- बीड- परळी रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने मार्गी लावा – अँड गणेश कोल्हे

रेल्वे प्रश्नी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष ॲड. कोल्हेंनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री दानवेंची भेट

गेवराई, मराठवाड्यातील रेल्वे जाळे वाढवताना अहमदनगर- बीड- परळी या रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने करुन सोलापूर- बीड- गेवराई- अंबड- जालना-जळगाव या रेल्वे मार्गाचे काम मार्गी लावावे अशी मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसचे बीड जिल्हाउपाध्यक्ष ॲड गणेश कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटी दरम्यान केली.

गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर – बीड – परळी रेल्वे महामार्गाचे काम सुरु असून ते अत्यंत धिम्या गतीने चालू आहे.सदर कामात आपण व्यक्तीश: लक्ष घालून तात्काळ व जलदगतीने रेल्वे मार्गाचे काम करून घ्यावे.जेणेकरून बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या दळण-वळणाला गती मिळेल.व बिड जिल्हयाला विकासाच्या दृष्टीने न्याय मिळेल.तसेच
रेल्वे मार्गाने विशेष करून शेतकरी वर्गाला त्यांच्या शेती व मालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी योग्य राहील असे सांगुन शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला नवसंजीवनी मिळणार आहे. हा मार्ग शेतकऱ्यांत नव क्रांतीकारी बदल घडवेल त्यामुळे अहमदनगर- बीड- परळी या रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने व्हावे अशी मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अँड गणेश कोल्हे यांनी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटी दरम्यान केली याप्रसंगी अक्षय दानवे, महेश कदम,आदींसह सहकारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button