बीडबीड जिल्हा

गांधीगिरी आंदोलन वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष; युवकांनी घातले पुढाऱ्यांचे श्राद्ध

बीड – तालुक्यातील हिवरापहाडी हे 4 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावांतर्गत येत असलेल्या हिवरापहाडी ते दुर्गुडे वस्ती या रस्त्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचे श्राद्ध घालत गांधीगिरी आंदोलन काल येथील युवकांनी केले.

मागणीकडे दुर्लक्ष केले जाते, निवडणूक काळात नुसते आश्वासन दिले जाते मात्र काम काही होत नाही असे यावेळी आंदोलक रमेश हुलगुंडे यांनी म्हंटले. या श्राद्ध घालण्याच्या गांधीगिरी आंदोलनावेळी रमेश हुलगुंङे बाळु महानोर रामा किसन दुरगुङे शिंदे विश्वभंर हुलगुंङे कृष्णा हुलगुंङे पपु गोरे संतोष हुलगुंङे सखाराम रपनोर भास्कर महानोर बाळु शिंदे हनुमान शिंदे हनुमान चोरमले रामा खताळ पालवे परविन यांची उपस्थिती होती…

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button