जालनामराठवाडा

गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरे करा- सपोनी नागवे

आष्टी  :-कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत सण उत्सव येत आहेत या उत्सवातुन कोरोना प्रादुर्भाव वाढू शकतो असे संकेत दिसत असून कोरोना टाळण्यासाठी गर्दी करू नका असे आवाहन स पो नी शिवाजी नागवे यांनी केले आहे.
आष्टी ता परतूर येथे दि.5 रोजी बैल पोळा व गणेश उत्सवाच्या निमित्ताने शिवाजी नागवे यांनी शांतता समितीची बैठक पोलीस ठाणे आष्टी येथे आयोजित केली होती.या वेळी त्यांनी उपस्थितांना बोलताना सांगितले की, शासनाच्या आलेल्या परिपत्रकानुसार या वर्षी गणपती महोत्सव व या महिन्यात येणारे सर्वच सण हे अगदी साध्या पद्धतीने साजरे करावे,तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे गरजचे असून, गणपतीचे विसर्जन हे गेल्या वर्षी प्रमाणेच होणार असून,मिरवणुकीसाठी कुठलीही परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच गणपती उत्सवात रक्तदानासारखे विधायक कार्यक्रम आयोजित करण्याचे आव्हान ही केले.याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे,हबीब शेख,सुमंत पाटील,नारायण पळसे, धनंजय कडपे,रखमाजी कोल्हे,मैलाना अलीम बागवान, फारुख कुरेशी, इरफान कुरेशी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार सह अनेकांची उपस्थिती होते

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button