गेवराईबीड जिल्हा

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा –अमरसिंह पंडित

अमरसिंह पंडितांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

गेवराई ) अमृता नदीला आलेल्या पुरामुळे शेतामधील पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झालेले असुन
मौजे बोरी पिंपळगांव, उमापूर, खळेगांव, माटेगांव येथील शेतजमीनी पिकांसह खरडुन गेलेल्या आहेत. त्यामुळे पिकासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गेवराई तालुक्यातील मौजे बोरी पिंपळगांव, उमापूर, खळेगांव, माटेगांव आदी ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे व अमृता नदीला आलेल्या पुरामुळे शेतामधील पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झालेले असुन अमृता नदीला आलेल्या पुरामुळे जमीनीही पिकांसह खरडुन गेलेल्या आहेत. आजुन पर्यंत पंचनामे झालेले नसुन तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्या बाबतचे निवेदन बोरी पिंपळगांव, खळेगांव, उमापूर आदी ठिकाणच्या शेतकर्‍यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये तहसिलदार सचिन खाडे यांना दिले आहे.

यावेळी बोलतांना अमरसिंह पंडित म्हणाले की, तीन-चार दिवसापासुन मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्याने आणि अमृता नदीला आलेल्या पुरामुळे शेतकर्‍यांच्या पिकासह जमीनी खरडुन गेलेल्या आहेत. त्याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांचे संयुक्त पथक नियुक्त करुन तात्काळ पंचनामे सुरु करुन ज्या शेतकर्‍यांच्या जमीनी खरडुन गेलेल्या आहेत त्यांचेही पंचनामे करुन अहवाल तात्काळ पाठविण्याचे तहसिलदार यांना निर्देश दिले.

यावेळी गणेश वडघणे, नितीन पवार, सुरेश आहेर, परशुराम पवार, विठ्ठल वडघणे, अशोक गवारे, वसंत मोटे, भास्कर मोटे, सचिन मोटे, योगेश जाधव, भास्कर वडघणे, सचिन कोरडे, सतिष आहेर, अतुल पठाडे, महादेव कोरडे, सागर देवडे, जगन्नाथ दिलवाले, संतोष दिलवाले, मधुकर आहेर, तिर्थराज शिंदे, परमेश्वर आमटे, एकनाथ आहेर, भाऊसाहेब आहेर, वसंतराव कणशे, आण्णा कणशे, योगेश आहेर, शहादेव भोसले, कल्याण औटे, रमेश अभंग, रामेश्वर दिलवाले, महेश आहेर, बंडु दिलवाले, शेख मुराखा पठाण, बंडु बहीर, लहु कर्‍हे, विजय आहेर, शेख सुलेमान, शेख हुसेन, फक्कड शिंदे, प्रभाकर बहीर, बाबासाहेब आहेर आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button