बीडबीड जिल्हा

आधी कोरड्या अन आता ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, राज्य सरकारने आधार द्यावा

आ. सुरेश धसांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

  • पीकविमा मंजुरीसाठी शासनाकडून तात्काळ हालचाली व्हाव्यात

    बीड ) बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन जिल्ह्यातील ओल्या व कोरड्या दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा यासह इतर विषयांबाबत मागण्या केल्या.
    प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, १०० % पेक्षा जास्त पाऊस झालेला तालुक्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास आदेशीत करावेत, आधी कोरड्या व आता ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असून तात्काळ सरसकट नुकसान भरपाई व पीकविमा मंजूर करण्यात यावा, जिल्हात कोव्हीड रुग्णांना जेवण पुरवलेल्या कॅन्टीन चालकांचे पैसे तात्काळ वर्ग करावेत, जिल्ह्यातील भूसंपादनाचे प्रलंबित कामे मार्गी लावावेत, जिल्ह्यातील ऊसतोडणी कमगारांची जनगणना करून त्यांना ओळखपत्र द्यावेत तसेच नगरपंचायतचे प्रलंबित कामे मार्गी लावावेत, आरोग्य विभाग, महसूल विभाग,पंचायत समिती व अन्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरले जावेत यासाठी आपण तातडीने लक्ष द्यावे या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे, जिल्हा प्रशासन अधिकारी अंधारे यांनी सकारात्मक विचार करून तात्काळ या मागण्या मार्गी लावण्याची शाश्वती दिली, यावेळी जिप सदस्य प्रकाश कवठेकर, वणवे दादा, सरपंच हरी पवार आदींची उपस्थिती होती..

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button