गेवराईबीड जिल्हा

सरसकट मदतीसाठी पाठपुरावा करू – अमरसिंह पंडित

चिखल तुडवत अमरसिंह व विजयसिंह पंडित शेतकऱ्यांच्या बांधावर

गेवराई,  ः- उध्वस्त झालेली पिके, खरडून वाहून गेलेल्या जमीनी, फुटलेले तलाव हे सर्व पाहताना माजी आ.अमरसिंह पंडित यांच्यासमोर नुकसानग्रस्तांनी आपल्या व्यथा, वेदना आणि दुःख व्यक्त केले. अनेकांना अश्रु अनावर झाले, यावेळी अमरसिंह पंडित यांनी शेतकर्यांना धिर देवून आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची जाणीव करून दिली. नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जातेगाव गटातील दहा गावांना त्यांनी भेटी दिल्या तर विजयसिंह पंडित यांनी उमापूर आणि शेकटा भागात थेट बांधावर जावून शेतकर्यांना धिर दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांना धिर देत थेट चिखल तुडवत, नदी-नाल्यातून रस्ता काढत बांधावर जावून शेतकर्यांच्या भेटी घेवून नुकसानीची पाहणी केली. भेंड (खु.), भेंड (बु.), खेर्डा, नंदपूर, मारफळा, यमगरवाडी, सेलु, टाकळगव्हाण, बाबुलतारा आदी गावांत अमरसिंह पंडित यांनी तर उमापूर आणि शेकटा शिवारात विजयसिंह पंडित यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांना धिर दिला. अतिवृष्टीमुळे फुटलेले तलाव, खरडून वाहून गेलेल्या शेतजमीनीची त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. संबंधित यंत्रणेतील अधिकार्यांना तेथून दुरध्वनीद्वारे संपर्क करून पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले. यावेळी अनेक शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडल्या, माजी आ.अमरसिंह पंडित यांनी उपस्थित महिला, ग्रामस्थ आणि शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना ऐकून घेतल्या.

आपल्या जवळचा कोणीतरी संकटकाळात आस्थेवाईकपणे विचारपूस करत असल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये होती. अनेकांना आपल्या व्यथा मांडताना अश्रु अनावर होत होते. महाविकास आघाडीचे सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठिशी असल्याचा विश्‍वास अमरसिंह पंडित यांनी यानिमित्ताने दिला. सरसकरट सर्वांना शासनाकडून मदत मिळेल, रस्ते, पुल आणि फुटलेल्या तलावाच्या संदर्भात लवकरच कृती आराखडा तयार करून दुरुस्तीची कामे सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी या दौर्यात सांगितले. यावेळी माजी सभापती माऊली आबुज, वसंतराव उबाळे, शेख मिनहाज, उपसभापती शाम मुळे, प्रकाश जगताप, मोहन कुटे, नारायण डरफे, रवि शिर्के, सुभाष मस्के, अनिरुद्र तौर, दत्ता गव्हाडे, मोहन लोंढे, मदन उबाळे, अंकुश शिंदे, उमेश शिंदे, देवराव यमगर, केशव जाधव, गोपाळ शिंदे, विलास शिंदे, प्रल्हाद उबाळे, बाळू शिंदे, महादेव नाईकवाडे, रमेश कादे, दत्ता आरडे, बाबासाहेब रडे, सुनिल राऊत, बाबासाहेब पाटील, परमेश्‍वर नाईकवाडे, बाळासाहेब नाईकवाडे, रामेश्‍वर उबाळे, मुसा शेख, तैमुर शेख यांच्यासह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.

विजयसिंह पंडित यांच्यासमवेत माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, डॉ.विजयकुमार घाडगे, रावसाहेब देशमुख, वसीम सौदागर, जयदीप औटी, अजहर इनामदार, रफिक सौदागर, मुबारक शेख, यादवराव त्रिंबके, दयानंद कापसे, अनिल देशमुख, अशोक नवपुते, अविनाश आहेर, अजय आहेर, राधाकिसन शेंबडे, भागवत महानोर, महारुद्र महानोर, राजेंद्र महानोर, बाबासाहेब शेंबडे, बाबासाहेब डोईफोडे, शिवाजी महानोर, नामदेव महानोर, भारत महाराज, जगन्नाथ हापटे, सुदाम हापटे, हरिश्‍चंद्र शेंबडे, नागेश महानोर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button