बीडबीड जिल्हा

पिक विम्याचे क्लेम दाखल करण्यास मुदतवाढ द्या – अमरसिंह पंडित

पिंपळनेर भागातील नुकसानग्रस्तांची घेतली भेट

बीड,  ः- माजी आ.अमरसिंह पंडित यांनी पिंपळनेर जि.प.गटातील ताडसोन्ना, पिंपळनेर, बेडकुचीवाडी, रामगाव, रंजेगाव, नाथापूरसह आदी नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून शेतकर्यांना धिर दिला. पिक विम्याचे क्लेम दाखल करताना शेतकर्यांना येणार्या अडचणी लक्षात घेवून नुकसानीची माहिती देण्यास आणि क्लेम दाखल करण्यास ७२ तासांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. या भागात सरसकट नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार असल्याचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले.

पिक विमा हप्ता भरलेल्या शेतकर्यांना पिक विमा नुकसानीनंतर ऑनलाईन क्लेम दाखल करताना मोठ्या अडचणी येत आहेत. विमा कंपनीची वेबसाईट व पोर्टल बंद असून टोलफ्री क्रमांक सुध्दा लागत नसल्याच्या तांत्रिक अडचणींना शेतकर्यांना सामोरे जावे लागत आहे. दि.२९/६/२०२० च्या शासन निर्णयात पिक नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत देण्याची तरतुद केली आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकर्यांना ७२ तासांच्या मुदतीमध्ये हे शक्य होत नाही. आजवर शासनाने कृषी विभागामार्फत ऑफलाईन अर्ज स्विकारले मात्र नुकसानीनंतर ७२ तासांची मुदत पूर्ण होत असल्यामुळे आजपासून क्लेम दाखल करून घेणे बंद केले आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आक्षेप नोंदवत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्याला स्वतःचे घर, संसार सावरताना क्लेम दाखल करण्यास विलंब होत आहे, त्यामुळे विमा कंपनीने क्लेम दाखल करून घेण्यास ७२ तासांची मुदत वाढवून द्यावी आणि कृषी विभागामार्फत ऑफलाईन पध्दतीने पिक नुकसानीचे क्लेम दाखल करून घ्यावेत अशी मागणी केली. पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील ताडसोन्ना, पिंपळनेर, बेडकुचीवाडी, रंजेगाव, नाथापूर, लिंबारुई आदी भागातील नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.

या भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी आपल्या व्यथा आणि अडचणी अमरसिंह पंडित यांच्यासमोर व्यक्त केल्या. नुकसानीचे पंचनामे करण्यास तलाठी आणि कृषी सहाय्यक आले नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. याची दखल घेवून एकंदरीतच गेवराई विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे झालेलया नुकसानीच्या अनुषंगाने लवकरच पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांची आपण भेट घेणार असून सरसकट पंचनामे करून मदत देण्याचा आग्रह त्यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी अमरसिंह पंडित यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, पं.स.सदस्य किशोर सुरवसे, संजय पाटील, परमेश्‍वर पाटील, बाबुराव यादव, सोमनाथ भोसले, अमोल ढेपाळे, बंकट माने, दत्ता पाटील, प्रभाकर माने, सिताराम मुंडे, गणेश माने, रामभाऊ माने, प्रमोद माने, अशोकराव कवचट, उध्दव पैठणे, रामचंद्र सोनवळ, नंदकुमार मोरे, रमेश नागरगोजे, महेंद्र कुटे, भगवानराव देवडकर, लक्ष्मणराव करांडे, कैलास गायवळ, तान्हाजी विर, शालीग्राम थोटे, दत्ता दुबाले, भागवत दुबाले, तुकाराम दुबाले, निलेश पवार, अशोक काशिद, दादासाहेब खिंडकर, माऊली चिंचकर, रामनाथ चिंचकर, अशोक बांडे, पांडुरंग पठाडे, बळवंत चव्हाण पाटील, प्रदिप घुमरे, श्रीकृष्ण कदम, प्रदिप चव्हाण, महादेव गिराम, रामभाऊ आबुज, रामभाऊ देवडकर, सुरेश देवडकर यांच्यासह पिंपळनेर, ताडसोन्ना व नाथापूर पंचक्रोषीतील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button