जालनामराठवाडा

पांडेपोखरी येथे जलशुद्धीकरण नळाची तोडफोड

सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस ठाणे आष्टी येथे निवेदन

आष्टी / प्रतिनिधी
परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथे ग्रामपंचायत च्या वतीने बसवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रांच्या नळाची अज्ञाताकडून तोडफोड करून त्या ठिकाणी शौचास बसून घाणेरडे कृत्य केल्याने गावातील नागरिकांनी आष्टी पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले आहे.
या घटनेने गावातील पाणीपुरवठा खंडीत झाला असून,संबधीत व्यक्तीने जर या पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकले असते तर मोठा अनर्थ घडला असता.येणाऱ्या काळात परत अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून पोलीसांनी संबधीत आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान दिलेल्या निवेदनात केले आहे,या संदर्भात पोलीसांनी संबधीत घटनेचा एन.सी.आर दाखल केला आहे.यावेळी सरपंच(प्र) राजेभाऊ जगताप,उप.सरपंच कैलास जगताप,बच्चीरभाई शेख,शिवाजीराव खरात,अशोकराव जगताप,अकृर जगताप,भाऊसाहेब जगताप,नारायण जगताप,प्रकाशराव जगताप,रामजी जगताप,किशोर जगताप,शरद इंगळे,भाऊसाहेब खरात,शिवाजी जगताप आदींची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button