गेवराईबीड जिल्हा

गेवराई शहरात भाजपाला भगदाड

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

गेवराई ) नगरपालिकेचे पडघम वाजताच गेवराई शहरात भाजपाला भगदाड पडले असून गेवराई नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष यांचे कट्टर समर्थक तथा भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते राम म्हेत्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, नगरसेवक राधेश्याम येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गेवराई शहरातील चिंतेश्वर गल्ली येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा विद्यमान उप नगराध्यक्ष यांचे कट्टर समर्थक राम म्हेत्रे, महेंद्र सावंत, अनिल म्हेत्रे, अनिल म्हेत्रे (फिटर), नितीन चौधरी, नंदू म्हेत्रे, सुनिल नाईक, दत्ता म्हेत्रे, रितेश म्हेत्रे, सुनिल काळे, राधेश्याम यादव, किशोर सावंत, दत्ता लाड, विठ्ठल घाडगे आदींनी भाजपच्या एकाधिकार शाहीला कंटाळून माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जि. प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चिंतेश्वर गल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले.

मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला विलास निकम, रवि म्हेत्रे, दिनेश घोडके, अनिल जवंजाळ, दिपक आतकरे, राजाभाऊ जवंजाळ,
दत्ता दाभाडे, अक्षय पवार, राजाभाऊ जवंजाळ, धमपाल भोले, मोहसिन शेख, अमित वैद्य, पप्पू भुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button