जालनामराठवाडा

मराठा आरक्षण मिळत नसल्याने येणोरा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आष्टी /प्रतिनिधी
ओलादुष्काळ आणी मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी ही लागत नसल्याने व्यवस्थेला कंटाळून येणोरा ता परतूर येथील तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली असून सदाशिव शिवाजी भुंबर वय २२ असे मयत तरुणाचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार सदाशिव हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत जॉब करीत होता त्याने इलेक्ट्रेशन चा कोर्स केलेला आहे मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्याला जॉब मिळत नव्हता वीस पंचवीस दिवसांपूर्वी तो गावाकडे येनोरा येथे आला होता त्याला चार एकर शेती आहे मात्र गावाकडे ही सतत पाऊस असल्याने ओला दुष्काळ असल्याने शेतातील पिके ही गेली आहेत याच विवंचनेत त्याने मंगळवारी घरच्या छताच्या अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तशी चिठ्ठी ही त्याने लिहून ठेवली असल्याचे त्याचे चुलते अंकुश भुंबर यांनी सांगितले
या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु ची नोंद घेण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे अधिक तपास पोलीस करीत असून पंचनाम्यात सर्व बाबी समजतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button