गेवराईबीड जिल्हा

तलवाड्याचा खेळाडू गजानन खंडागळे यास शारदा प्रतिष्ठानची आर्थिक मदत

विजयसिंह पंडित यांच्याहस्ते धनादेशाचे वितरण

गेवराई, ) ः- गेवराई तालुक्यातील मौजे तलवाडा येथील खेळाडू गजानन शहादेव खंडागळे याने महाराष्ट्र राज्य एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता ठरला असून शारदा प्रतिष्ठानच्यावतीने त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याहस्ते आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. गजानन खंडागळे याने एअर रायफल स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून सुवर्ण पदक पटकावले त्यामुळे गेवराई तालुक्याची मान उंचावली असून शारदा प्रतिष्ठान त्याच्या पाठिशी खंबीर उभा आहे असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी यावेळी केले.

तलवाडा येथील गजानन खंडागळे हा खेळाडू महाराष्ट्र राज्य एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता ठरला आहे. ग्रामीण भागातील या खेळाडूने सुवर्ण पदक मिळवल्यामुळे गेवराई तालुक्याच्या लौकिकात भर पडली आहे. गजानन खंडागळे याची घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या नाजुक असल्यामुळे त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी शारदा प्रतिष्ठानच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याहस्ते आर्थिक मदतीचा धनादेश गजाननचे वडिल शहादेव काळे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी दैठणचे सरपंच प्रताप पंडित यांच्यासह नितीन पंडित, विलास देवकते, नामदेव घोडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान शारदा प्रतिष्ठानच्यावतीने वेळोवेळी विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीक यांना वेळोवेळी आर्थिक मदत करण्यात आली असून प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली होतकरू व गरजु विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने मदत करण्यात आली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button