गेवराईबीड जिल्हा

हिंगणगावचे शिवसेना कार्यकर्ते गजानन जाधव राष्ट्रवादीत

विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत केला जाहिर प्रवेश

गेवराई,) ः- गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते तथा शालेय समितीचे अध्यक्ष गजानन जाधव आणि गेवराई शहरातील भाजपचे सक्रीय कार्यकर्ते दादासाहेब म्हेत्रे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी विजयसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

हिंगणगाव येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा शालेय समितीचे अध्यक्ष गजानन जाधव, ग्रा.पं.सदस्य बदाम जाधव, भारत जाधव, संभाजी बारहाते, मनसुख जाधव, ज्ञानेश्‍वर जाधव, जयराम सदाफुले, संतोष जाधव आदींनी शिवसेनेच्या गलथान कारभाराला कंटाळून माजी आ.अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. विजयसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत केले. यावेळी दैठणचे सरपंच प्रताप पंडित यांच्यासह नितीन पंडित, विलास देवकते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गेवराई शहरातील चिंतेश्‍वर गल्ली येथील भाजपचे कट्टर समर्थक दादासाहेब म्हेत्रे आणि रमेश म्हेत्रे यांनी विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी राम म्हेत्रे, अनिल जवंजाळ, नगरसेवक राधेशाम येवले, दत्ता दाभाडे, अक्षय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button