बीडबीड जिल्हा

ना.डॉ.भारतीताई पवार यांच्या संकल्पनेतुन हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी

नाशिक येथे मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम

नाशिक, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भरतीताई प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून नाशिक येथे ० ते १८ वर्षाखालील बालकांच्या सर्व आजारावरती मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या या महाशिबिरात दोन दिवसात हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी साठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ना.भारतीताई पवार यांच्या वतीने मास्क, नेलकटर, हँडवॉश , साबण , टूथ पेस्ट, टूथ ब्रश, खोबरेल तेल, बदाम तेल, आदीं आरोग्यदायक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले

सामान्य माणसांच्या उपचारासाठी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराच्या महायज्ञाला सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भरतीताई पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राहुल दादा आहेर होते. तर आ. राहुल डिकले, आ. सीमाताई हिरे , महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, भाजपा जिल्हाध्यक्ष केदारनाना आहेर , शहर अध्यक्ष गिरीष पालवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना.भारतीताई पवार यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बलशाली नेतृत्वाखाली देश सदृढ व आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच उपेक्षित व वंचित घटकातील शेवटच्या व्यक्तीला पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे देशातील सामान्य माणूस पैशाअभावी आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असेही ना.पवार म्हणाल्या.
यावेळी बोलताना ओमप्रकाश शेटे यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पद संवेदनशील नेत्या डाॅ.भारतीताई यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला लाभले असल्याचे सांगितले. त्यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य गरीब लोकांच्या विविध शस्त्रक्रिया ताईंच्या मार्गदर्शनाने मुंबई येथील पंचतारांकित हाॅस्पिटल मध्ये मोफत पार पाडण्यात येतील असेही ते म्हणाले.
पुढे बोलतांना ओमप्रकाश शेटे म्हणाले की, भारतीताई पवार यांचे खाजगी सह सचिव म्हणून सध्या माझ्याकडे मोठी जबाबदारी आलेली आहे. माझा आरोग्य क्षेत्रातील 15 वर्षापासून असलेला अनुभव आता कामी येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच पंतप्रधान निधीमधून मोफत वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे नियम पाळून झालेल्या शिबिरात डॉक्टरांच्या टीम सह स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

135 रुग्णांच्या दुर्धर आजारांवर होणार शस्त्रक्रिया
या शिबिरात तपासणी दरम्यान 135 रुग्णांना विविध दुर्धर आजार असल्याचे निदान झाले. यांपैकी काही रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर वरती बोनमॅरो ट्रान्सप्लांट, अस्थिव्यंगांवर अर्थोपेडिक सर्जरी, डोळ्यांच्या दुर्धर आजारांच्या व इतर आवश्यक शस्त्रक्रिया मुंबईच्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये करण्यात येतील.
– ओमप्रकाश शेटे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button